मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पीएने मागितलेल्या कथित लाच प्रकरणाचं उठलेलं वादळ शांत होत नाही तोच आणखी एका मंत्र्याच्या पीए वरुन वाद उद्भवलाय. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा पीए सुनील माळी यांच्या विरोधात एका सरकारी महिला डॉक्टरनं विनयभंग केल्याचा आरोप केला  आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मंत्री दीपक सावंत यांच्या कार्यालयात अँटी चेंबरमध्ये महिला डॉक्टरला बोलवून लज्जास्पद संभाषण आणि कृत्य केल्याचा आरोप आहे. 


या प्रकरणी संबंधीत महिला डॉक्टरनं मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. दरम्यान सुनील माळीला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. या प्रकरणी पोलिसांनीही सखोल चौकशी करुन गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितले आहे.