राज्यात आतापासून उन्हाचा कडाका वाढला...
उत्तर महाराष्ट्र , विदर्भ, मराठवाड्यात पारा चढलेला दिसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका कमालीचा वाढलाय, उत्तर महाराष्ट्र , विदर्भ, मराठवाड्यात पारा चढलेला दिसणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.
यंदा नेहमीपेक्षा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अधिक असणार आहे. मे महिन्यात सर्वाधिक तापमान असेल, असा ही अंदाज कुलाबा वेधशाळा वर्तवला आहे. यंदा साधारण तापमान पारा ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असणार असल्याचा अंदाज आहे.
राज्य सरकारनेही उष्माघात रोखण्यासाठी काही उपाय योजना सुचवल्या आहेत, तसेच काही सूचना दिल्या आहेत. पांढरे सुती कपडे वापरावेत, जास्तच जास्त पाणी प्या, तसेच दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत घराबाहेर पडणे टाळा, अशा या सूचना आहेत.