हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश
सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : सर्जिकल स्ट्राईकच्या पार्श्वभूमीवर गुप्तचरविभागाने राज्य सरकारला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये वाहन हायजॅक करुन किंवा बनावट कार पास बनवून अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाच्या सूचनेनुसार विधीमंडऴ परीसरात वाहन पार्किंगचे नियम बदलण्यात आले आहेत. अशी माहिती त्यानुसार कुठल्याही मंत्र्यांच्या वाहनांना विधिमंडळ परिसरात प्रवेश आणि पार्किंग करता येणार नाहीये, हा नियम अगदी मुख्यमंत्र्यांच्या गाडीलाही लागू असणार आहे. दहशतवादी ह्ल्ल्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिलीये. मुख्यमंत्र्यांच्या वाहनाला विधिमंडळ परिसरात पार्किंग नाही असा निर्णय इतिहासात पहिल्यांदाच होतो आहे.