मुंबई : उत्तर महाराष्ट्र, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात उष्णता वाढेल आणि पर्यायानं कमाल तापमानही वाढेल, असं कुलाबा वेधशाळेनं म्हटलं आहे. याशिवाय पुढचे दोन तीन दिवस राजस्थान,  गुजरातमध्येही तापमान वाढणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरसह संपूर्ण राज्यातील तापमान वाढत असताना, उन्हाचा हा तीव्र चटका या संपूर्ण उन्हाळ्यात भोगावा लागणार असल्याचं वेधशाळेनं स्पष्ट केलंय. गेल्या तीन दिवसांपासून पारा चढाच असून विदर्भात तर पाऱ्याने ४२ अंश सेल्सियसची मजल पार केलीय. 


यंदा पारा १ ते दीड सेल्सियसपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात एकीकडे नागपूर तापणार असले तरीही दुसरीकडे राज्यातील तापमान देखील सामान्य पेक्षा जास्त राहणार आहे. दरम्यान उष्ण वारे उत्तर पश्चिम दिशेने वाहत आहेत.