मुंबई : तुमच्या स्कूल बॅगवर किंवा ट्रॅव्हलिंग बॅग, पाऊचवर असं बटणासारखं दिसणार हे काय असतं, याचा प्रश्न अनेकवेळा पडतो, पण हे शोभेसाठी बॅगेला लावण्यात आले असेल, असे म्हणून आपण दुर्लक्ष करतो, मात्र याचा वापर फार मोठा आणि सुरक्षित आहे.


हे काही बटण नसून तुम्ही तुमच्या बॅगेत मोबाईल, अथवा टॅब ठेऊन हेडफोन बाहेर काढू शकतात, एवढंच नाही तर चार्जिंग करताना मोबाईल बॅगेत ठेऊन बाहेरून चार्जर लावू शकतात, यामुळे तुमचा मोबाईल अथवा टॅब सारख्या वस्तुंची सुरक्षितता वाढत असते.