मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

९ विभागात १८ फेब्रुवारी ते २८ मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडेल. राज्यातील जवळपास १४ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 


जवळपास तीन हजार केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात सात भरारी पथक नेमण्यात आलेत. तर कॉपी रोखण्यासाठी एकूण २५२ पथकं सज्ज आहेत. यंदापासून पहिल्यांदाच प्रौढ लेखनिक घेण्यास परवानगी देण्यात आलीय.