मुंबई : ईएमआय ग्रस्त आणि ईएमआयला त्रस्त झालेल्या लोकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण 'आयडीबीआय बॅंके'ने कर्जावरील व्याज दर कमी केले आहेत. आयडीबीआय बँकचे होमलोन आणि इतर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयडीबीआयचा व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी करून ९.६५ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी ९.७५ टक्के व्याजदर आकारण्यात येत होता. बॅंकेने मुख्य कर्ज दरसुद्धा (बीपीएलआर) १४.२५ टक्‍क्‍यांवरून १४.१५ टक्‍क्‍यांवर आणला आहे.


आयडीबीआयचे त्यामुळे आता ईएमआय कमी होणार आहेत, आयडीबीआय बॅंकेच्या होमलोन धारकांना दिलासा मिळणार आहे. हे कमी केलेले दोन्ही दर ०१ ऑगस्ट २०१६ पासून लागू होणार आहेत.


बँकेने म्हटलं आहे, 'आयडीबीआय बॅंकेने व्याजदर कपात केल्यामुळे बॅंकेच्या ग्राहकांचे सर्व 'बेस रेट लिंक्ड' कर्ज आणि ईएमआय कमी होणार आहेत. शिवाय व्याजदरात कपात केल्यामुळे चालू वर्षात गृह कर्ज, वाहन कर्ज, एसएमई कर्ज आणि इतर किरकोळ कर्जाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे'.