पॅन कार्ड नसेल तर बॅंकेतील पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत!
![पॅन कार्ड नसेल तर बॅंकेतील पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत! पॅन कार्ड नसेल तर बॅंकेतील पैसे तुम्हाला काढता येणार नाहीत!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2016/12/16/209484-newnote.jpg?itok=yAoSuVCm)
मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर ज्यांकडे या नोटा आहेत, त्यांना बॅंकेत जमा करण्याची मुदत आता ३० डिसेंबरपर्यंत आहे. तुम्ही बॅंकेत लाखो रुपये जमा केले असतील तर यापुढे ते पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्ही बॅंकेतील तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने स्पष्ट केलेय.
मुंबई : मोदी सरकारने ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा रद्द केल्या. त्यानंतर ज्यांकडे या नोटा आहेत, त्यांना बॅंकेत जमा करण्याची मुदत आता ३० डिसेंबरपर्यंत आहे. तुम्ही बॅंकेत लाखो रुपये जमा केले असतील तर यापुढे ते पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्ही बॅंकेतील तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने स्पष्ट केलेय.
बँक खात्यात लाखोची संपत्ती जमा करणाऱ्याचे आता काही खेरे नाही. रिझर्व्ह बँकेने (RBI) ठराविक बँक खात्यांवर कठोर निर्बंध लादले आहेत. २ लाख रुपयांच्यावर बँकेत ठेवी असणाऱ्या खातेधारकांना आरबीआयने पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड नंबर सक्तीचा केला आहे. त्यामुळे पॅन नंबर नसेल तर बँकेतून एकही पैसा काढता येणार नाही. यामुळे खातेधारकांना धडकी बसणार आहे.
ज्या बॅंक खात्यात ५ लाखांहून अधिक रक्कम आहे आणि ९ नोव्हेंबर नंतर ज्या खात्यात २ लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे, अशा खातेधारकांवर रिझर्व्ह बँकेने बँकींग व्यवहारासाठी कठोर पावले उचलली आहेत. या खातेधारकांना बँकेतून पैसे काढताना आणि पैसे भरताना पॅन नंबर देणे सक्तीचे करण्यात आले आहे.
तसेच एकाद्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांनी फॉर्म नंबर ६० भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. हे तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला एकही पैसा बॅंकेतून काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट नमूद करण्यात केले आहे.