मुंबईत मनसे विभागप्रमुखाची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी
आगामी महापालिका निवडणुकीत मनसेत दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. दादर-माहीममध्ये याच प्रत्यय येण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागप्रमुखाची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत मनसेत दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे. दादर-माहीममध्ये याच प्रत्यय येण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागप्रमुखाची पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.
दादर-माहीम मनसेत फेरबदल कण्यात आले आहेत. मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांची विभाग अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ही नेमणूक केली.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरबदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांची विभागप्रमुख पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. पाटणकर आपल्या पत्नीसाठी विभागातून उमेदवारीसाठी इचछुक होते. तसेच महापालिका उमेदवारीसाठी पक्षात स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची भीती आहे. ही बंडखोरी थोपविण्यासाठी संघटनेत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.