भारतीय रेल्वेच्या १ कोटी ग्राहकांची महत्वाची माहिती चोरीला
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींग करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. आयआरसीटीच्या १ कोटी ग्राहकांची अत्यंत महत्वाची माहिती चोरीला गेल्याचं समोर आलंय.
मुंबई : ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींग करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. आयआरसीटीच्या १ कोटी ग्राहकांची अत्यंत महत्वाची माहिती चोरीला गेल्याचं समोर आलंय.
पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्सचे नंबर
रेल्वेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची माहिती चोरीला गेलीय. आयआरसीटीसीच्या माध्यमातून रोज लाखो तिकीटं आरक्षित केली जातात. त्यासाठी पॅन, आधार, ड्रायव्हिंग लायसन्सचे नंबर अशी महत्वाची माहिती वेबसाईटवर द्यावी लागते. याच माहितीची चोरी झाल्याचं पुढे आलंय.
काळ्या बाजारात मोठी मागणी
या माहितीला काळ्या बाजारात मोठी मागणी आहे. क्रेडीट कार्ड कंपन्या, टेलिकॉम कंपन्या, त्याचप्रमाणे अनेक टेलिमार्केटिंग कंपन्यांना ही माहिती अत्यंत गरजेची असते. त्यामुळे या माहितीचा गैरवापर होण्याच्या शक्यतेनं रेल्वे यंत्रणा खडबडून जागी झालीय.
दरम्यान ग्राहकांच्या बँक खात्यासंदर्भातली कुठलही माहीती आयआरसीसीटीच्या वेबसाईटवर नोंदवली जात नाही. त्यामुळे कुणाचंही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नसल्याचं अधिका-यांचं म्हणणं आहे.