मुंबई: शीना बोरा हत्याप्रकरणाचं गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे. शीना बोराची हत्या गळा दाबून करण्यात आली होती, असा दावा शीनाची आई इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर रायनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शीना बोराच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि श्यामवर अटकेत आहेत. 2012मध्ये इंद्राणी आणि पीटरनं शीनाची हत्या केली आणि रायगडच्या जंगलात शीनाचा मृतदेह फेकून दिला असा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा मी तिकडे होतो, मला सगळी माहिती आहे, असं श्यामवर म्हणाला आहे. यामुळे इंद्राणी आणि पीटरच्या अडचणीत वाढ झाली आहे. 


श्यामवर राय याने न्यायालयात हजर राहून माफीचा साक्षीदार बनवण्याची न्यायालयाला विनंती करत अर्ज केलाय. श्यामवर रायच्या या अर्जावर सीबीआय १७ मे रोजी आपले म्हणणे न्यायालयात सांगणार आहे.