एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ
एसटी कर्मचाऱ्यांवर पगाराच्या बाबतीत सतत अन्याय होत असतो, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून होत असतो.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांवर पगाराच्या बाबतीत सतत अन्याय होत असतो, असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून होत असतो.
मात्र एसटी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसटीकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली.
महागाई भत्ता ११९ वरुन १२५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे महागाई भत्त्यात तब्बल सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.
जानेवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकी रकमेपैकी २५ टक्के रक्कम ही ऑगस्ट २०१६च्या वेतनात देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे.
दरम्यान, एसटीच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना गणपती उत्सव आनंदात साजरा करता येणार आहे.
उर्वरित ७५ टक्के रक्कम ही एसटीकडून लवकरच देण्यात येणार असल्याचं एसटी महामंडळानं म्हटलं आहे.