दिपाली जगताप-पाटील, मुंबई : सध्या सुट्ट्यांचा माहौल सुरु झालाय. त्यामुळे फिरायला जाण्याचे प्लान आखले जात आहेत. तुम्हीसुद्धा अशाचप्रकारे काही नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुट्ट्यांनिमित्त बाहेरगावी फिरायला जाण्यासाठीचा असा उत्साह तुमच्यातही असेल. बाहेरगावी जाण्याचं प्लानिंगही तुम्ही करत असाल. मात्र मे महिना सुरु होण्याआधीच रेल्वेचे बाहेरगावी जाण्याचे तिकीटबुकिंग फुल्ल झालेत. आयआरसीटीसी मार्फत तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी तिकीट बुक करत असाल तर अनेक थंड हवेच्या ठिकाणच्या प्रदेशांचे तिकीट बुकींग आत्ताच फुल्ल झालंय. त्यामुळे हे तिकीट बुकींग थांबण्यात आलंय.. 


- मे महिन्यासाठी उत्तर भारतातील महत्त्वाच्या पॅकेज टूरचे बुकिंग फुल्ल झालंय. 


- हिमालयीन ब्यूटी, ईशान्य भारत, ग्लोरी ऑफ हिमालय, उटी, कुर्ग, कोडाईकनाल, दार्जिलिंग, शिमला या सर्व टूरचे मे महिन्यासाठीचं तिकीट बुकिंग फुल्ल झालंय. 


- तर रशिया, कंबोडिया, युरोप, दुबई या परदेशी टूरसाठी मे आणि जून महिन्याचे बुकिंग फुल्ल झालंय. टूर पॅकेजसोबत बाहेरगावी जाण्याच्या तिकीटाची विक्रीही वाढलीय. 


फुल्ल झालेल्या तिकीट बुकींगमध्ये जर रद्द झाले तरच दुसऱ्या एखाद्या प्रवाशाला आता तिकीट मिळू शकणार आहे. तसंच उन्हाळा लक्षात घेता आणि प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वेने पाण्याचा पुरवठाही वीस टक्क्यांनी वाढवलाय.