मुंबई : गुडीपाडवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा सण.  मराठी नवीन वर्षाची सुरुवात. यामुळे गुडीपाडव्याला नवीन वाहन, वस्तू किंवा सोने खरेदीला ग्राहक महत्व देतात. सोने बाजारात या दिवशी कोट्यवधींची उलाढाल होते. यंदा अबकारी कराविरोधात पुकारलेल्या बंदमुळे पहिल्यांदाच गुडीपाडव्याला ग्राहकांच्या सोनेखरेदीच्या मुहूर्तावर सगळीकडे विरजण पडले. मात्र जळगाव मधील सराफांनी गुडीपाडव्याला सोने खरेदीची संधी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडीपाडव्याला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे लहान मोठे दागिने घेणे ग्राहक या दिवशी पसंद करतात. महाराष्ट्रासह, मध्यप्रदेशमधूनही ग्राहक जळगावला सोनेखरेदी करण्यासाठी येतात.


सोन्याचा प्रतितोळा दर २९ हजार दोनशे रुपये होता. मात्र बंद मुळे गुडीपाडव्याचा सण असूनही सोनेखरेदीला थंड प्रतिसाद दिसून आला.