मुंबई : जय वाघाचा एक व्हिडीओ समोर आलाय. जय वाघाचा हा व्हिडीओ तो बेपत्ता होण्यापूर्वीचा आहे. या व्हिडीओत जय वाघाची शान पाहायला मिळतेय. जय वाघ किती दिमाखदार आणि भव्य होता हे तुम्ही पाहू शकता. मात्र आता बेपत्ता जय वाघावरुन राजकारण रंगू लागलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी जय वाघ जिवंत असल्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा चुकीचा असून ते चुकीची माहिती देत असल्याचा आरोप भाजप खासदार नाना पटोले यांनी केलाय. 


बेपत्ता जय वाघप्रकरणी मुनगंटीवारांनी गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केलीय. याचं पटोले यांनी स्वागत केलंय. दरम्यान या प्रकरणी सीबीआय चौकशी होईलच मात्र तोवर तातडीने सीआयडी चौकशी करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.