मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे आयोजित ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . 


मुंबईत नाट्यपरिषदेच्या कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये सावरकरांची एकमताने निवड करण्यात आली. नाटयसंमेलनाच्या अध्यक्षाची जरी निवड झाली असली, तरी नाट्यसंमेलनाचे स्थळ मात्र अद्याप निश्चित झालेलं नाही.