मुंबई : मॅग्रोव्ह तोड प्रकरणात कपिल शर्मा याच्यानंतर आता त्याच्या शेजा-यांवर कु-हाड कोसळणार आहे. जिल्हाधिका-यांकडे आलेल्या तक्रारीनुसार वर्सोवा पोलीसाकडे आतापर्यंत ६४ जणांविरुद्ध पर्यावरण संरक्षण नियमानुसार एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.  भविष्यात याच कायद्याच्या कचाट्यात आणखीनही सेलिब्रिटी जाळ्यात येण्याची शक्य़ता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशासनाने आता के वेस्ट वॉर्डमधील वर्सोवा आणि आरामनगरमध्ये कारवाई अधिक कडक केलीय. कपिल शर्मासोबतच त्या भागातील अनेक लोकानी प्राथमिक तपासात दोषी असल्याचे सिद्ध झालय. आणि त्याच्यावर आता पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार त्याच्यावर तक्रार दाखल करण्यात आलीय.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ही कारवाई वर्सोवा परिसरात सुरु आहे पण त्यानंतर आरामनगर १ आणि २ मध्ये ही कारवाई होणार आहे. याच विभागात बॉलीवुड सेलिब्रिटीचे आलिशान बंगले आहेत. यासोबतच शक्ती कपूर, सोनू सुद जावेद जाफरी, कैलाश खेर यांच्या बंगल्याबाबतही अनेक तक्रारी महापालिकेकडे असल्याने त्यांचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. एका ट्विटनं कपिलनं फक्त स्वत:लाच नाही तर त्याच्या शेजाऱ्यांनाही अडचणीत आणलं आहे.