ठाणे : भिवंडी बायपासवरचा खारीगावचा टोलनाका येत्या १३ मे पासून बंद होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणा अंतर्गत येणारा हा टोलनाका १९९८ मध्ये सुरू झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेली अनेक वर्ष आयडीयल रोड बिल्डर्सच्या माध्यमातून या टोलनाक्यावर वसूली करतात. १९९८ मध्ये अत्यंत अरुंद असणाऱ्या या रस्त्यावर चार लेनचा हायवे तयार करण्यात आला. तेव्हापासून हा टोलनाका सुरु आहे. रस्त्याच्या बांधकामासाठी १८० कोटी रुपये खर्च झाला. पण प्रत्यक्षात या टोलवर आतापर्यंत ५०० कोटी रुपये वसूली झाली आहे. २००२ च्या गॅजेटमध्येच १३ मे रोजी हा टोल नाका बंद होणार असं जाहीर करण्यात आलं होतं.