मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्सची घोषणा केली आहे. त्याशिवाय गरज पडल्यास आणखी ४२ गाड्यांबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे चेअरमन संजय गुप्ता यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण रेल्वेमार्गावरील ११ नवीन स्टेशनचं लवकरच उद्घाटन होणार आहे. त्यामध्ये सावंतवाडी टर्मिनल २ सह महाराष्ट्रातील ९ आणि कर्नाटकातील २ स्थानकांचा समावेश आहे. त्याशिवाय चिपळूण-कराड या नवीन रेल्वेमार्गासाठी येत्या १४ ऑगस्टला सामंजस्य करारावर स्वाक्ष-या करण्यात येणार आहेत, असेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले. 


- कोकण रेल्वेच्या ११ नवीन स्टेशनचं उद्घाटन होणार


- सावंतवाडी स्टेशन टर्मिनल २ चे उद्धाटन


- चिपळून - कराड नविन रेल्वेमार्गाच MOU करणार


- १४ ऑगस्ट ला सह्याद्री अतिथी गृहावर होणाऱ्या कार्यक्रमात होणार सामंजस्य करार


- गणेश उत्सवासाठी कोकण रेल्वे ने मध्य रेल्वेसोबत १८० ट्रेन्स चे घोषणा 


- ४२ ट्रेन्सबद्दल आणखी विचार करत आहोत