विधान परिषद निवडणूक : काँग्रेस - राष्ट्रवादीत तिढा कायम
विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा काँग्रेस- राष्ट्रवादीमधील तिढा सुटायला तयार नाही.
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा काँग्रेस- राष्ट्रवादीमधील तिढा सुटायला तयार नाही.
विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात सध्या राष्ट्रवादीचे अनिल भोसले आमदार आहेत. भोसले यांच्यासह पिंपरी -चिंचवडचे आझम पानसरे , विलास लांडे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
उमेदवारी दिल्यास निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनिल भोसले हे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे व्याही आहेत.
त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास भोसले वेगळा मार्ग शोधणार का अशी चर्चा सुरु आहे. मात्र त्यावर बोलायचं भोसले यांनी टाळले आहे.