LIVE UPDATE : आज लाडक्या बाप्पाला निरोप
पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जन मिरवणुकीचा उत्साह दिसून येत आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर शहरात विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली आहे.
पुण्यात रिमझिम पाऊस, पण तरीही विसर्जन मिरवणूक वेळेवरच सुरू होण्याची शक्यता (20.00 AM)
मुंबईत रिमझिम पाऊस, पण मिरवणुकीचा उत्साह कायम, गणेश गल्लीत ओसांडून वाहतोय उत्साह (10.17 AM)
कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात, डॉल्बी विरहित मिरवणुकीला सुरूवात (10.15 AM)
पुण्यातही विसर्जन मिरवणुकीला सुरूवात, पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला सुरूवात ( 10.10 AM)
पुण्यात बाप्पाच्या मिरवणुकीत ठिकठिकाणी प्रबोधनपर रांगोळ्या
मुंबईचा राजाच्या मिरवणुकीला सुरूवात, लालबागमध्ये उत्साहाचं वातावरण (10.00 AM)