मी प्रकाश`भाईं`शी बोलेन- माधव भांडारी
भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी यांनी आपण या विषयी मी प्रकाशभाईंशी बोलेन, असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी यांना प्रकाश मेहता यांच्या बोलण्याविषयी विचारले असता, या विषयी मी प्रकाशभाईंशी बोलेन, असं सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे माध्यमं काही बाबतीत अतिरेक करत असल्याचं माधव भांडारी यांनी म्हटलं आहे.
बगल देत भांडारी म्हणाले, माध्यमही कधी-कधी अतिरेक करतात
माध्यमं अतिरेक करतात, याविषयीच्या काही प्रतिक्रिया आपण सोशल मीडियावर पाहात आहोत, असं भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भांडारी य़ांनी म्हटलं आहे, पण माध्यमं कोणत्या बाबतीत अतिरेक करीत आहेत, याविषयी ते स्पष्टपणे काहीही सांगू शकले नाहीत.
तुमच्या प्रकाश'भाईं'ना प्रश्न विचारणे अतिरेक आहे का?
भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांना रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणे वागण्याविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रश्नाला बगल देत माध्यमंही काही बाबतीत अतिरेक करत असल्याचं मत मांडलं. मात्र प्रकाश मेहता यांच्या उद्दामपणाविषयी माधव भांडारी काहीही बोलले नाहीत, ते शेवटपर्यंत प्रकाशभाईंशी बोलेने, माहिती घेईन, असंच सांगत होतं.
प्रकाश मेहतांना ताण-तणाव सहन होत नाही का?
प्रकाश'भाईं' यांनी ताणतणावात येऊन असं काही होवू शकतं, घटना, वातावरण हे ताणतणावाचं होतं, असंही माधव भांडारी यांनी म्हटलंय. यावर काँग्रेसचा सचिन सावंत यांनी म्हटलंय, ताणतणावातचं सरकारला काम करावं लागतं, यात असं संतापण योग्य नाही, कारण आपण कुणावरही उपकार करत नाही, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.