मुंबई : राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेट आता मराठीत देवनागरीत लिहिता येणार आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या मागणीला ग्रीन सिग्नल दाखवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहनांचे नंबर मराठीत असावेत, अशी मागणी शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या या मागणीला यश मिळाले आहे. मात्र, राज्याबाहेर जाणाऱ्या गाड्यांचे नंबर हे इंग्रजीत ठेवावे लागणार आहेत. राज्याच्या बाहेर न जाणार्‍या वाहनांचे क्रमांक मराठीत असावेत यासाठी शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली.


महाराष्ट्रातील वाहनांवरील क्रमांक हे मराठी भाषेत असावेत यासाठी आपण युती सरकारमध्ये परिवहनमंत्री असताना आग्रह धरला होता. परंतु त्यावेळी केंद्र सरकारने इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये क्रमांक असावेत असे आदेश दिले होते. त्यामुळेच वाहनांवर दोन्ही भाषांमधील क्रमांक दिसून येऊ लागले, अशी माहिती परिवहनमंत्री रावते यांनी दिली.