आता मी तुम्हाला भेटायला येईन : राज ठाकरे
आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
मुंबई : आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त आज राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महापालिकेमध्ये मनसेला मोठा फटका बसला. नाशिकमध्ये काम करूनही आम्ही हरलो आणि ज्या लोकांनी पैसा वाटला त्यांनाच जनतेनी जिंकवून दिले असे ते म्हणाले.
गेली पाच वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जनतेसाठी भरपूर कामे केली. प्रत्येक वेळी मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला त्या लोकांना जनतेनी निवडून दिले असे ते यावेळी म्हणाले.
नाशिक शहराचा कायापालट केला. परंतु नाशिकच्या लोकांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांना निवडून दिले. ही बाब अतिशय चुकीची आहे, असे ते म्हणाले. तुम्ही जो पायंडा पाडला आहे त्याने तुमचेच भविष्यात नुकसान होणार आहे असे ते म्हणाले.
दरम्यान, मनसेला मतदान केलेल्यांचे राज ठाकरेंनी आभारही मानले आहेत. मनसेचे उमेदवार आणि मतदारांचे धन्यवाद, ज्यांनी मनसेला मतदान केलं नाही त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची हे शिकवलं, असंही वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
ठळक बाबी
- निकाल आला तेव्हा माझ्या मनातली पहिली प्रतिक्रिया
ज्यांनी पहिलं मतदान केलं त्यांचे आभार
- ज्यांनी मतदान केलं नाही, त्यांनी शिकवलं, काम करून मतं मिळत नाहीत
- ज्यामुळे मतदान केलं जात असेल, त्याचा पुरवठा यापुढे केला जाईल
- काम केलं हीच मोठी चूक झाली
- काम केल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत
- काम करून मतं मिळतात, असं मला निवडणुकीत दिसत नाही.
- ज्या पक्षाकडे माणसं नव्हती ते जिंकले, जे राबराब राबले, - अडीअडचणीला धावून आले, त्यांना पराभव पत्करावा लागला.
- मनसेचा अकरावा वर्धापन दिन