`१ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद`
१ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय फामपेडाने घेतला आहे, हा निर्णय सरकारच्या हेल्मेटसक्तीच्या धोरणाविरोधात आहे.
मुंबई : १ ऑगस्टपासून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय फामपेडाने घेतला आहे, हा निर्णय सरकारच्या हेल्मेटसक्तीच्या धोरणाविरोधात आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे. फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
'नो हेल्मेट नो पेट्रोल' या धोरणाला ग्राहकांचा विरोध दिसून येत आहे, पंप चालक आणि ग्राहक यांच्यातील वाद टाळण्यासाठी पेट्रोल-डिझेल खरेदीच बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ पेट्रोल डिलर्स असोसिएशनने घेतला आहे.
फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी म्हटलंय, 'कायदा पाळला, तर ग्राहकांडून मारहाणीची भीती असते, कायदा न पाळल्यास सरकारकडून गुन्हे दाखल होतील, अशा कात्रीत आम्ही सापडलो आहोत. सरकारचा हेल्मेटसक्तीचा निर्णय जनतेच्या हिताचाच आहे. मात्र, अंमलबजावणीदरम्यान आम्हाला त्रास सहन करावा लागतो'.