मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात राज्य सरकारने आज प्रामुख्याने वस्त्रोद्योगाच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत केले. त्याअनुषंगाने राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कापसावर आधारित उद्योग उभे केले जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीकेसी येथील मेक इन इंडिया सेंटरमध्ये राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणावर एक चर्चासत्र पार पडले. मुख्यमंत्र्यांसह, वस्त्रोद्योग मंत्री आणि उद्योगमंत्री यात सहभागी झाले होते. राज्यात वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबरोबरच 11 लाख रोजगाराचे उद्दीष्ट्य सरकारने आगामी काळात ठेवले आहे. 


कापूस उत्पादनात आपला देश आघाडीवर असला तरी कापसावर प्रक्रिया होत नाही. मात्र कापूस उत्पादक भागात 10 टेक्सटाईल पार्क उभारण्याचे नियोजन सरकारने केले आहे. यासाठी उद्योगांना विशेष सवलतीही दिल्या जाणार आहेत.