मुंबई : मिरवणुकीत पोलिसाचं पिस्तुलासह तांडव, पिस्तुलाच्या धाकाने पोलिसाने मिरवणुकीतील भक्तांना नाचवलं, अशीच हेडलाईन टेलव्हिजन मीडियाची हा व्हिडीओ पाहून राहिली असती. मात्र असं काहीही झालेलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण अभिनेता मनोज वाजपेयीने अभिनय केलेला ११ मिनिटांचा सिनेमा प्रत्येकाने पाहावा असा आहे. तेव्हाच कळणार आहे, त्या पोलिसाने पिस्तुलाच्या धाकाने मिरवणुकीतील भक्तांना का नाचवलं.


(तांडव ही अकरा मिनिटाची शॉर्ट फिल्म पाहा बातमीच्या सर्वात खाली) तुमचे अकरा मिनिटं अजिबात वाया जाणार नाहीत.


पोलिसांवर किती प्रचंड तणाव आहे, हे एका ओळीत लिहून कुणालाही कळणार नाही. म्हणून ही ११ मिनिटाची शॉर्टफिल्म जरूर पाहा. तुमचा पोलीस हवालदार जर इमानदार आहे. तर तो आपल्या आयुष्यात किती गोष्टींना मुकतो, त्याला पैशांची गरज असूनही बहुतांश वेळा तो वाकड्या वाटेने जात नाही. 


मात्र आर्थिक बाबी आणि कामाचा ताण त्याला निश्चितच सतावणारा आहे. मात्र सर्वात शेवटी हे दु:ख फक्त सोसणाऱ्यालाच कळेल, इतरांसाठी ते यू-ट्यूबवर पांडूचं विसर्जन मिरवणुकीतलं 'तांडव'चं आहे. देवाशीष मखिजा यांनी या चित्रपट दिग्दर्शित केला आहे.