31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा मोर्चा स्थगित
31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आलाय.
मुंबई : 31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आलाय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्रातील जिल्हावार मोर्चाच्या संयोजकांची बैठक 15 जानेवारीला दादर येथे आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मुंबईत 31 जानेवारीला मराठा क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.