मुंबई : राज्यात 52 मोर्चाचे आयोजन केल्यानंतर आज सकल मराठा समाजा तर्फे राज्यव्यापी मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलयं. या निमित्ताने मराठा कुणबी समाज आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडीअमपासून मोर्चाला सुरूवात होईल, तर मॉरीस टी पॉइंट येथे मोर्चा संपणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं या मोर्चाचे महत्व वाढलं आहे. मोर्चा संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपले म्हणणं ऐकून घ्यावं अशी मोर्चेकरांची मागणी आहे. सर्व पक्षांचे आमदार यामोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे. मूक मोर्चासाठी पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुमारे 1100 पोलीस कर्मचारी या मोर्चासाठी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीनं तीन भागात विभागणी केली आहे. याशिवाय ड्रोन कॅमेरा, अॅम्बुलंस, पिण्याचे पाणी, बॉम्ब शोधक पथक आणि राज्य राखीव कृतीदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 12 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली असून मोर्चा मार्गात वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.