मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे
मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेताल आहे.
मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेताल आहे. जे.जे. हॉस्पिटलचे अधिष्ठाता तात्याराव लहाने आणि नेत्रचिकित्सा विभागाच्या प्रमुख रागिणी पारेख यांच्या बदलीच्या मागणीसाठी हे डॉक्टर सहा दिवसांपासून संपावर होते.
डॉक्टर संपावर गेल्यामुळे जे.जे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या असंख्य रुग्णांचे हाल होत होते. त्यामुळे शनिवारी कोर्टाच्या सुट्टीचा दिवस असूनही या प्रकरणावर न्यायलायनं सुनावणी केली आणि संपावर असलेल्या डॉक्टरांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश दिले.