मुंबई : संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली लोकल मुंबईमध्ये उद्यापासून धावणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात या प्रकारचे दोन लोकल रेक तयार करण्यात आलेत. पश्चिम रेल्वेवर ही गाडी धावेल.


दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बंबार्डियर लोकलसारखीच ही गाडी दिसत असली तरी ही पूर्णतः देशी बनावटीची लोकल आहे. हैदराबादच्या मेधा सर्वोड्राईव्ह या कंपनीनं गाडीची संपूर्ण विद्युत यंत्रणा तयार केलीय.


सर्व प्रकारच्या सुरक्षा चाचण्यांमधून तावून-सुलाखून बाहेर आल्यानंतर आता हे रेक प्रवाशांच्या सेवेत रुजू होत असल्याचं विभागीय रेल्वे आयुक्त मुकुल जैन यांनी सांगितलं. 


शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस इथं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या पहिल्या हिरवा झेंडा दाखवतील. बम्बार्डियर लोकलची किंमत ४४ कोटी ३६ लाखांपर्यंत जाते. तर, या नव्या 'मेधा लोकल'ची किंमत ४३ कोटी २३ लाख रुपयांच्या घरात आहे.