अंधेरीत मेडिकल दुकान आगीत ७ ठार
अंधेरी येथे मेडिकल दुकानाला सकाळी साडेसहाच्या वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ ठार तर २ जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई : अंधेरी येथे मेडिकल दुकानाला सकाळी साडेसहाच्या वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ ठार तर २ जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंधेरी पश्चिम येथील दिगंब चाळीतील मेडिकल स्टोअरला ही आग लागली होती. आगीतील जखमींवर कुपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चाळीत वन प्लस वन असे घर होते. दुकानाला खाली आग लागली. त्यावेळी वरती झोपलेल्या लोकांना कळले नाही. त्यामुळे या आगीत जीवत घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
ही आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या तीन गाड्यांना पाचारण करण्यात आले. आता आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे.