मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. तुम्ही जर उद्या रविवारी मध्य रेल्वेवर प्रवास करणार असाल, तर आधी ही बातमी वाचून मगच प्रवासाचा बेत ठरवा. विशेषतः कल्याणपलीकडचा प्रवास उद्या जास्त त्रासदायक होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेच्या मार्गावर शेलू ते कर्जत आणि कल्याण आणि टिटवाळा दरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकलसेवा रद्द करण्यात आल्यायत. शेलू ते कर्जत दरम्यान रविवारी सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारा दरम्यान मेगाब्लॉक आहे. 


या काळातल्या सहा लोकल अंबरनाथ-बदलापूरपर्यंतच धावणार आहेत. तर शहाड स्टेशनजवळची जलवाहिनी काढण्यासाठी कल्याण ते टिटवाळा दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळातही सकाळी 8 ते साडे बारापर्यंत काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.