मुंबई : रेल्वेच्या तिनही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 दरम्यान तर हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय तर मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर नऊ तासांचा पावर ब्लॉक घेण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवा रेल्वे स्थानकावर नव्या प्लॅटफॉर्मचं काम सुरू आहे. जलद मार्गावर कटिंग आणि अलाईनमेंटचं काम करण्यासाठी हा ९ तासांचा विशेष पावर ब्लॉक घेण्यात आलाय. सकाळी सवानऊ ते सायंकाळी सव्वा सहा वाजेपर्यं हे काम सुरु रहाणार आहे. 


दरम्यानच्या काळात जलद मार्गावरील मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून कल्याणच्या दिशेनं येणारी वाहतूक ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान सर्वच स्थानकांवर थांबतील. 


या पावर ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील अर्धातास उशिराने धावतील. तर काही लोकलच्या फे-या रद्द केल्या असून सीएसटी ते ठाणे आणि सीएसटी ते कुर्ला या मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत.