मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी... मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.30 ते दु. 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुसरीकडे हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्टेशन्स दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात आलाय. 


या मेगाब्लॉकमुळे सीएसटीला ये-जा करणा-या लोकलच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान अंधेरी ते बोरिवली दरम्यान  जलद मार्गावरील अप-डाऊन वाहतूक धीम्या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.