मेट्रोच्या साकीनाका स्टेशनवर आत्महत्या, मेट्रो सेवा विस्कळीत
मेट्रोच्या साकीनाका स्टेशनवर एकानं आत्महत्या केल्यामुळे मेट्रोचा खोळंबा झाला आहे.
मुंबई : मेट्रोच्या साकीनाका स्टेशनवर एकानं आत्महत्या केल्यामुळे मेट्रोचा खोळंबा झाला आहे. घाटकोपरवरून वर्सोव्याला जाणारी मेट्रो ही मरोळपर्यंतच चालवण्यात येत आहे.
रविवार असल्यामुळे मेट्रोमध्ये गर्दी नसली तरी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणाऱ्यांना मात्र यामुळे अडचणी होत आहेत. आधीच मध्य रेल्वेवर महा मेगा ब्लॉक असल्यामुळेही प्रवाशांचा खोळंबा होतं आहे.