मुंबई : मंत्र्यांना अंधारात ठेवून म्हाडानं काढलेल्य़ा ३ हजार ६१२ कोटी रुपयांच्या स्वस्त घरांच्या योजनेसाठीच्या टेंडरला स्थगिती देण्यात आलीय. याप्रकरणी म्हाडाचे सीईओ, आणि उपाध्यक्षांकडून अहवाल मागवण्यात आलाय. 


म्हाडानं एका विशिष्ट कंत्रातदारासाठी हे टेंडर काढल्याचं लक्षात आल्यावर तातडीनं टेंडरला स्थिगिती देण्यात आलीय.  विशेष म्हणजे कंत्राट दारासाठी तीन अटी शिथिल करण्यात आल्याचंही प्रथम दर्शनी पुढे आलंय.  याप्रकरणी योजना खोळंबली तरी चालेल अशी भुमिका मंत्र्यांनी घेतल्याचं सूत्रांनी म्हटलंय.