`एमआयएम`ची राज्यातील कोअर कमिटी बरखास्त
महाराष्ट्रातील एमआयएमची कोअर कमिटी, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बरखास्त केली आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्रातील एमआयएमची कोअर कमिटी, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बरखास्त केली आहे.
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांपुरतीच ही कमिटी होती, असं स्पष्टीकरण ओवेसेंकडून देण्यात आले आहे.
निवडणुकांमध्ये प्रत्येकाला आपापली जबाबदारी पार पाडता आली नाही, त्यामुळे एमआयएमने राज्यात ९ सदस्यांची जी कोअर कमिटी तयार केली होती. ती बरखास्त करण्याचा निर्णय ओवेसींनी घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.
ओवेसींनी ही कोअर कमिटी पुणे, सोलापूर आणि मुंबईत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने बरखास्त केली. पुणे आणि लातूरमध्ये एमआयएमचे अंतर्गत वादही होते असं सांगण्यात येत आहे.
पुण्यात जलील यांनी तिकीट वाटपासाठी पैसे घेतल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बाबू शेख यांनी केला होता.
ओवेसी बंधू आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळत, लातूरमध्ये सुमारे दीड हजार कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.