मुंबई : मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होत आहे. ही घटना आज दुपारी घडली. बच्चू कडू यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्रालयातील कर्मचाऱयांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कडू यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंत्रालय कर्मचाऱ्यांनी केली आहे.


या घटनेनंतर गावित यांचा रक्तदाब वाढल्याने उपचारासाठी त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मंत्रालयातील कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. सर्व कर्मचारी तळमजल्यावर एकत्र झाले होते. कर्मचारी संघटनेने कडू यांचा निषेध केला.