आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच, व्हिडिओ क्लिप व्हायरल
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच आहे. आमदार रमेश कदमांनी पोलीसांना अर्वाच्च शिव्या दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे.
तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात जात असताना कदम आणि सोबतचे पोलीस यांच्यात वाद झाला. वादादरम्यान कदमांनी शिवराळ भाषा वापरल्याचं क्लीपमध्ये उघड होतंय. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर मनोज पवार आणि आमदार यांच्या ही बाचाबाची झाली होती.
तेव्हा मनोज पवार यांनी कंट्रोलला फोन लावत अधिक कुमक मागवून घेतली. त्याची डायरी नागपाडा पोलीस ठाण्यात केली. नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी जवाब नोंदवला असून पोलीस उपायुक्त याप्रकरणाची चौकशी करणार असून पुढील कारवाई करणार आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपात गेले अनेक महिने रमेश कदम तुरूंगात आहेत. कदमांकडून वारंवार अशीच अरेरावीची भाषा पोलीसांना ऐकावी लागत असल्याचं बोलंल जात आहे.
दरम्यान, आता रमेश कदमांच्या या वागणुकीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जेलमध्ये जावूनही पैशांचा माज जात नसल्याचं म्हटले आहे.
आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच, व्हिडिओ क्लिप व्हायरल