महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का
आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय. आधी कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर देवेंद्र आंबेरकर यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे.
काँग्रेस नगरसेवक देवेंद्र आंबेरकर हे मुंबई महापालिकेतले माजी विरोधी पक्षनेते आहेत. काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे.
दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमाराला मातोश्रीवर जाऊन, आंबेरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार यांचा खरपूस समाचार घेतला.