मुंबई : अघोषित युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित करणे हा ही एक प्रकारचा हल्लाच आहे. हा हल्ला सामान्य नागरिक, जवान यांच्यावर नसून देशाच्या स्वाभिमानावर आहे. माझ्या देशावर हे पाकपुररस्कृत हल्ले होत असतानाही त्या कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचायचं का?, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उरीवर, मुंबई आणि देशातील अनेक ठिकाणांवर, निरापराध लोकांवर, सीमेवर डोळ्यात तेल घालून आपल्या  भारतमातेचे रक्षण करणाऱ्या जवानांवर झालेले भ्याड हल्ले. आधी 1971चे युद्धनंतर कारगील आणि अजूनही तेच सुरु आहे. माझ्या देशावर हे पाकपुरस्कृत हल्ले होत असतानाही त्या कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचायचं का, असा सवाल राज ठाकरे यांनी पोस्टरच्या माध्यमातून उपस्थित केलाय.


आपले कलाकार जग जिंकायला लागलेत आणि त्या कलाकारांना पैसा कमवायला इकडे यावेसे वाटते. बाकी त्यांना अभिमान पाकिस्तानचाच. कली ही दोन प्रांतांना जोडते पण माझ्या आईवर हल्ले होत असताना कलेला कडेवर घेऊन नाचायची कला नाही आपली. चला ठरवूया तर तुम्ही आणि आम्ही या पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट बघणार नाही. कारण या निर्मात्यांना पैसे कमवायचेत, देशप्रेम नाही. त्यामुळे करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्कील' चित्रपटाला मनसेचा विरोध कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. .


ऐ दिल है मुश्किलच्या प्रदर्शन वादाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे निवेदन