मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये एक हाती सत्ता आणण्याचं शिवसेनेचं स्वप्न भंगलं आहे. शिवसेनेला निवडणुकीमध्ये 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या. पण या निवडणुकीमध्ये मनसेमुळे शिवसेनेला 30 ते 35 जागांवर फटका बसला आहे.


अनेक भागांमध्ये शिवसेना उमेदवारांचा निसटता पराभव झाला असून या भागामध्ये मनसेनंही चांगली मतं मिळवली आहेत. भाजपसोबत युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला, पण उद्धव ठाकरेंनी मात्र हा प्रस्ताव फेटाळली आणि निवडणूक स्वबळावर लढली. या निवडणुकांमध्ये शिवसेना मनसेमध्ये युती झाली असती तर कदाचीत याचा फायदा शिवसेनेला झाला असता, असं बोललं जात आहे.