मुंबई : केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने शिवसेना नाराज आहे. त्यामुळे शपथविधीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे. आम्ही लाचारी स्वीकारणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून पुन्हा एकदा भाजप शिवसेनेत वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसल्याने शिवसेना नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळं शपथविधीवर शिवसेना बहिष्कार घालण्याची शक्यता आहे. 


शिवसेनेची राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप काहीही ठरले नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्याच्या विस्तारात शिवसेनेनं दोन जागा मागितल्याची चर्चा होती. मात्र जे द्यायचं ते  सन्मानानं द्या, लाचार होऊन कोणासमोर जाणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.


राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसली, तरी मुख्यमंत्र्यांसोबत जुजबी बोलणं झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यापूर्वीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजप शिवसेनेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.