मुंबई : नगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं व्यूहरचना आखलीय. येत्या 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतायत. मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते दोन भूमिपूजन समारंभ संपन्न होणारायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामध्ये वडाळा ते घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4 आणि विरार-वांद्रे उन्नत रेल्वे मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन त्यांच्या उपस्थितीत पार पडणाराय. मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा होतोय. 


यानिमित्तानं भाजपचा महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.