महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी खुशखबर...
मान्सून यंदा केरळात जरी उशिरानं दाखल होणार असला तरी महाराष्ट्रात मात्र यंदा वर्षा ऋतू वेळेवर येईल असं कुलाबा वेधशाळंनं स्पष्ट केलय.
मुंबई : मान्सून यंदा केरळात जरी उशिरानं दाखल होणार असला तरी महाराष्ट्रात मात्र यंदा वर्षा ऋतू वेळेवर येईल असं कुलाबा वेधशाळंनं स्पष्ट केलय.
कोकणात कधी...
दहा जून पर्यंत कोकणात तर पंधरा जूनपर्यत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून स्थिरवेल असं कुलाबा वेधशाळेचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालकडे सरकलेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेनं वेगानं होत असल्याचं पुढे आलंय.
केरळमध्ये कधी...
नेहमी केरळात मान्सून १ जूनला येतो यंदा सायक्लोनमुळे उशीर होणार असला तरी महाराष्ट्रा सर्वदूर जाण्यास अशीर होण्याची शक्यता नाही, तसच मान्सून कमी पडेल असे ही नाही, असे कुलाबा वेधशाळा संचालिका शुभांगी भुत्ते यांनी सांगितले.
दोन दिवस उष्णता राहणार...
पुढील २ दिवस वातावरणात उष्णाता काय़म राहाणार असून त्य़ानंतर वातावरण थंड होण्यास सुरुवात होईल