मुंबई : हवामान खात्याच्या नव्या डायनामिक पद्धतीनं अंदाज वर्तवणाऱ्या मॉडलनुसार येत्या अवघ्या ४ दिवसात, अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनाची शक्यता निर्माण झालीय. त्यासाठी पोषक हवामान तयार होतंय. नैरुत्य मोसमी मान्सून सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदमान निकोबारमध्ये दाखल होत आहे.


यंदा त्या आगमानसाठी अत्यंत पोषक हवामान तयार झालंय.  उत्तर आणि पश्चिम भारतात वाढणारं तापमान, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान पडलेला अवकाळी पाऊस, पूर्व किना-यावर झालेली च्रकी वादळासारखी परिस्थिती हे सगळे वातावरणीय बदल मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असल्याच नव्या डायनामिक मॉडेल द्वारे स्पष्ट होतं आहे.