मुंबई : यंदाच्या मान्सूनचा बंगालच्या उपसागरातला प्रवास सुकर होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा अंदमान निकोबार बेटांवर मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. येत्या ४८ तासात अंदमान-निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवला आहे.


पावसासोबत मान्सून बंगालच्या उपसागरात पुढे सरकारणार असल्याचंही वेधशाळेचं म्हणणं आहे. येत्या मेच्या शेवटापूर्वीच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.