माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांची गर्दी

माघी गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि मंगळवार असा दुर्मिळ योग आज आलाय. यासाठी मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आलीय.
मुंबई : माघी गणेश चतुर्थी, विनायक चतुर्थी आणि मंगळवार असा दुर्मिळ योग आज आलाय. यासाठी मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आलीय.
गणेश चतुर्थी निमित्त श्रींच्या मूर्तीची आज रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्यासाठी खास तयार केलेल्या नवीन सागवान लाकडी रथाला फुलांची आरास करण्यात आलीय. सुमारे चार लाख भाविक दर्शनाला येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
याचप्रमाणे राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.