मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातील कॉम्पुटर लॅबला आग लागली. दुपारी एक वाजेच्या दरम्यान लॅब मधील वातानुकूलित यंत्रामध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं ही आग लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तातडीनं त्यानंतर  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कॉलेजमधून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.  अग्निशमन दलाच्या जवानांनी यशस्वीरीत्या आग विझवली. 


या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र कॉम्पुटर लॅबमधील लाकडी सामान,  20 कॉम्पुटर्स आणि एक वातानुकूलित यंत्राचं नुकसान झालं आहे.